Weather Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर कमी झाल्याच दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढलं होते. त्यामुळे दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान (Weather Update) विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. राज्यात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली आहे. तर हवामान खात्याने लवरकरच राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.

Weather Update

16 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होणार असून, पुढेही हे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा सुरू राहील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये देखील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वरवण्यात आली आहे.

Leave a Comment