urea: पीएम मोदीकडून शेतकऱ्यांना दिलासा; स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद

Urea: शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रुपये असताना, शेतकऱ्यांना तो 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PM नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.

जागतिक बाजारपेठेत दुकांदारांकडून शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपेक्षाही जास्त भावाने युरिया विकला जात आहे. ज्या युरियाची पिशवी काही बाजारामध्ये 3 हजार रुपयांना विकली जाते, तोच युरिया (urea) आता सरकार आपल्या शेतकर्‍यांना 300 रुपये दराने देणार आहे. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना सांगितले.

हे पण वाचा: Ramai Awas Yojana: १० लाख लोकांना घरकुल – शिंदे सरकारने आणली १२००० कोटींची ‘मोदी आवास योजना’; योजनेचे निकष, कागदपत्रे…

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.

PM Narendra Modi: शेतकऱ्यांना (Farmers) स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांचे अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. युरियाच्या एका पिशवीची किंमत 3000 रुपये असताना, शेतकऱ्यांना तो 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.

2 thoughts on “urea: पीएम मोदीकडून शेतकऱ्यांना दिलासा; स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद”

Leave a Comment