RBI Repo Rate : ब्रेकिंग! आरबीआयने रेपो दरात ‘इतकी’ वाढ केली; सामान्यांसह शेतकऱ्यांच्या कर्जाचा वाढणार हप्ता, जाणून घ्या किती?

RBI Repo Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI ) आर्थिक आढावा धोरणाची तीन दिवसांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. बैठक झाल्यानंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) 35 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. रेपो रेटच्या खर्चाचा व्याजदरावर (Loan Interest) परिणाम होईल आणि तुमचा EMI ही वाढेल. आता रेपो दर 6.25% झाला आहे. याआधी 20 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती बँकेने (Bank Loan) रेपो दर 5.90% केला होता. याआधी यूएस फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरात (Interest Rate) नरमाईचे संकेत देण्यात आले होते.

मे महिन्यापासून रेपो दरात २.२५% ने वाढ झाली आहे. मे महिन्यापासून पाच वेळा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २.२५% नी वाढ केली आहे. यापूर्वी, एमपीसीच्या शिफारशीच्या आधारावर, आरबीआयद्वारे 4 मे रोजी रेपो दरात 0.4 %, 8 जून रोजी 0.5%, 5 ऑगस्ट रोजी 0.5% आणि 20 सप्टेंबर रोजी 0.5% वाढ करण्यात आली होती. मे महिन्यात सेंट्रल बँकेकडून व्याजदरात एकाएकी 0.40% वाढ करण्यात आली. RBI Repo Rate

हे पण वाचा: e shram card list: ई-श्रम धारकांना मिळणार 3000 रू. महिना यादी जाहीर लगेच यादीत नव चेक करा

हे पण वाचा.

RBI Repo Rate: ग्राहकांना दिलेली कर्जे महागणार

रेपो दरात वाढ झाल्यामुळे याचा परिणाम थेट बँकांनी ग्राहकांना दिलेल्या कर्जावर (Loan) होणार आहे. त्यामुळे कर्ज घेण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. बँकांना पैसा महाग झाला तर कर्जाचे व्याजदरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तर बँका हे परिणाम ग्राहकांपर्यंत पोहचवतील. मंगळवारी, जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.9% एवढा केला आहे.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर म्हणजे आरबीआयकडून (RBI) कोणत्याही बँकेला कर्ज दिले जाते. त्यानुसार बँका ग्राहकांना कर्ज देत असतात. याशिवाय रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे, ज्यावर RBI बँकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देत असते. आरबीआयचा रेपो रेट वाढल्याने बँकांवर बोजा वाढतो आणि बँका याचा परिणाम ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर होतो. RBI Repo Rate

Leave a Comment