Rain Update: राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण ! विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rain Update: मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आता काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाचे आगमन होणार आहे. राज्यात आज पावसाला पोषक हवामान झाले आहे. त्यामुळे विविध भागांत वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तापमानातील चढ-उतार कायम राहील | Rain Update

एवढंच नाही तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात कमाल तापमानातली चढ-उतार कायम राहील असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान राज्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे अलर्ट देण्यात आले आहेत.

जारी करण्यात आलेले अलर्ट | Rain Update

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जारी करण्यात आलेले अलर्ट

१) ऑरेंज अलर्ट – विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव
२) यलो अलर्ट- पुणे आणि नगर

तसेच उर्वरित राज्यातजोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती | Rain Update

सध्या मध्य प्रदेशमध्ये समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर देखील ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. याशिवाय मध्य प्रदेशपासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

तापमानात चढ-उतार होणार

दरम्यान राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. काल जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ३९ अंश सेल्सिअस असे हे तापमान होते. तसेच उर्वरित राज्यातील कमाल तापमान ३४ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment