Rain Update: राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Update: ऑगस्ट महिन्यात पावसाने पुर्णपणे विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र अशातच आता दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे. काल (शनिवारी) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता.

Rain Update: तसेच विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परंतु सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Leave a Comment