Pik vima new benifits update या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी.

Pik vima new benifits update नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहोत तर ही बातमी म्हणजे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 25% अग्री पिक विमा मिळणार आहे तसेच राज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विम्याच संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) राबवली जाते, याच योजनेच्या अंतर्गत खरीप हंगाम 2023 kharip pik vima 23 संदर्भातील एक महत्वपूर्ण शासन निर्णय government GR आलेला आहे. त्याची माहिती आता आपण पुढील प्रमाणे पाहू या.

राज्यात “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबविण्यास संदर्भ क्र. (२) अन्वये मान्यता देण्यात •आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. युनायटेड इंडिया जनरल इंशुरन्स कं. लि., युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि., चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं. लि.. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. एस बी आय जनरल इन्शुरन्स कं. लि. या ९ विमा कंपनीमार्फत 26 june 2023 शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

आपल्या कुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन अशी करा नावावर त्यासाठी येथे क्लिक करा

Pik vima new benifits update खरीप हंगाम २०२३ अंतर्गत राज्याच्या आयुष्य पोटी अग्रीम पीक विमा हप्त्याच्या अनुदानापोटी रक्कम रु.१२६५.७५ कोटी वितरीत करण्यात आली असुन त्यापैकी रक्कम रु.७४९.३७ कोटी इतका निधी पोर्टलनुसार संबंधित विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता (अग्रिम) म्हणून अदा करण्यात आला आहे आणि उर्वरित रक्कम रु.५१६.३८ कोटी इतका निधी शेतकरी हिस्सा विमा हप्त्याकरीता अदा करण्यात आला असुन विमा कंपन्यांना १०० टक्के शेतकरी हिस्सा विमा हप्ता अदा करण्याकरीता अधिकचा रु.१०३४.६० कोटी इतका निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

आपल्या घराच्या छतावर मोफत बसवा सोलर पॅनल पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या 26 june 2023 शासन निर्णयातील मुद्दा क्र. १४ मधील १ नुसार विमा कायद्याचे कलम ६४ बी नुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेला अग्रीम विमा हप्ता (पहिला हप्ता) या निधीचा वापर करून विमा कंपनीने प्रतिकूल हवामानामुळे पेरणी/ लावणी होवू न शकणे / हंगामातील प्रतिकूल परिस्थिती/ स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या बाबींसाठी नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक असल्याने नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना १०० टक्के शेतकरी हिस्सा देणे आवश्यक आहे.

2 thoughts on “Pik vima new benifits update या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी.”

Leave a Comment