Pavitra Portal Registration 2023:पवित्र पोर्टल सुरू होणार, सरकारची न्यायालयात माहिती

Pavitra Portal Registration 2023: शाळांना शिक्षक व शिक्षिका कर्मचारी भरण्यात येणाऱ्या अडचणी आता संपण्याच्या मार्गावर दिसत आहेत. येत्या आठवडाभरात पवित्र पोर्टल (Pavitra Portal) सुरू करण्यात येणार असल्याने शाळांची ही अडचण दूर होणार आहे.

शिक्षक व शिक्षिका कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी सुरू करण्यात आलेले पवित्र पोर्टल (Pavitra Portal) गेल्या काही वर्षांपासून बंद झालेले आहे. त्यामुळे शाळांना शिक्षक व कर्मचारी भरती करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

अखेर, पुढील सात दिवसांमध्ये संचमान्यता व रोस्टरला मान्यता दिली जाणार असून पवित्र पोर्टलसुद्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

पोर्टलसंदर्भात अधिसूचना जारी करून पाच वर्षांपासून बराच काळ लोटला. मात्र, विधिमंडळामध्ये याबाबत सरकारने मंजुरीच मिळविली नाही. त्यामुळे सेवासदनसह 129 शिक्षणसंस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Pavitra Portal Registration 2023

राज्य शासनाने 22 जून 2017 साली अधिसूचना जारी केली होती. यानुसार, mps नियम 6 व 9 मध्ये सुधारणा करीत शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल, अशी तरतूद केली होती.

कायद्यानुसार त्या संबंधित काळात येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात ती अधिसूचना मंजूर करून घेणे महत्वाचे होते. पण, मागील पाच वर्षांमध्ये ती मंजूर करून घेण्यात आलेली नाही.

यामुळे शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून हे पोर्टलच निरस्त झाल्याची राज्य सरकारने घोषणा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Leave a Comment