आता फळबाग लागवड योजनासाठी मिळणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या पात्रतेसह अर्ज प्रक्रिया

फळबाग लागवड योजना: यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विशेष गाजले आहे. यामध्ये विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान व पीकविमा यांसारख्या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

अर्थसंकल्पामध्ये सरकारने जाहीर केल्या विविध योजना

केंद्र सरकारच्या नमो शेतकरी किसान (namo shetkari Kisan Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच राज्यामधील शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीकविमा काढून मिळणार आहे, धान्य उत्पादकांसाठी बोनस, मागेल त्याला शेततळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सुद्धा राज्य सरकारच्या योजनांपैकी महत्वाची आहे. राज्यात 2018-19 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलती. राज्य सरकारच्या योजना शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत ही योजना राबविली जात आहे. राज्यामधील फळबागांचा विकास व्हावा व फलोत्पादन वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

तीन टप्प्यात 100 टक्के अनुदान दिले जाते

फळबाग लागवड योजना-अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान (Subcidy) देण्यात येते. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान तीन टप्प्यांमध्ये देण्यात येते.

1) पहिले वर्ष – ५०% अनुदान
2) दुसरे वर्ष – ३०% अनुदान
3) तिसरे वर्ष – २०% अनुदान

महत्त्वाची बाब म्हणजे 2 ऱ्या आणि 3 ऱ्या टप्प्यातील अनुदानाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायतीसाठी 90% व कोरडवाहूसाठी 80% असणे गरजेचे आहे. दरम्यान हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने झाडे आणून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे ठेवावे लागते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने-अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांची उपजीविका फक्त शेतीवर अवलंबून आहे, त्यांना या योजनेसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येते. तसेच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर स्वतःचा 7/12 असणे आवश्यक आहे. तसेच 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे गरजेचं आहे.

योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर जाऊन योजनेचा ऑनलाइन अर्ज करू शकता. तसेच ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सुविधा केंद्रात संपर्क साधावा.

Leave a Comment