Crop Insurance : शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई अदा करा

Crop Insurance जळगाव जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्याच्या आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून, खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार २७७ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा पीकविमा काढलेला आहे. Crop Insurance

या विम्याच्या निकषानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्‍भवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ अधिसूचना निर्गमित करून संबंधित विमा कंपनीकडून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना दिल्याच्या आहे, जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकरी झालेल्या नुकसानीची भरपाईस पात्र असून, तत्काळ संबंधित विमा कंपनीस याबाबत २५ टक्के अग्रिम स्वरूपात नुकसानभरपाई देण्याच्या जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीना सूचना दिल्याच्या आहेत.

1 thought on “Crop Insurance : शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई अदा करा”

Leave a Comment