Agriculture Electricity उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा चटका! कृषी पंपाच्या विजेसाठी मोजावी लागणार ‘इतकी’ वाढीव रक्कम

Agriculture Electricity उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी जास्त लागते. त्या पिकाला वेळेवर पाणी दिल नाही, तर ती पिकं करपून जातात. असं होऊ नये म्हणून शेतकरी विहिर, शेततळी, तलाव, बोअर या सिंचनाने पिकांना पाणी देत असतो. हे पाणी पिकांपर्यंत देण्यासाठी लागते. ते म्हणजे कृषी पंप आणि कृषी पंपासाठी आवश्यक असते वीज, अशी काही ठिकाणं आहे जिथे वीज उपलब्ध नाही. पण वीज असूनही ती खूपच महाग आहे तर? हो, वीज अजून महागणार आहे. महावितरणने (Mahavitran) पुढील दोन वर्षांकरिता वीज दरामध्ये वाढ केली आहे. उच्चदाब आणि लघुदाब कृषी पंपांसाठी प्रति युनिट 4 रुपये 17 पैसे ते 8 रुपये 59 पैसे एवढी वाढ केली आहे. अशी माहिती राज्य वीज नियामक आयोगाने दिली आहे.

अशी आहे दरवाढ | Agriculture Electricity

आत्तापर्यंत लघुदाब कृषी पंपासाठी Agriculture Electricity स्थिर आणि मागणी दर 43 रुपये एवढा होता. तो आता 2023-24 मध्ये 47 रुपये तर 2024-25 मध्ये 52 रुपये पर्यंत पोहचू शकतो. लघुदाब कृषी पंपासाठी सध्या प्रति युनिट 3 रुपये 30 पैसे असणारा दर आता 2023- 24 साठी 4 रुपये 17 पैसे तर 2024- 25 साठी 4 रुपये 56 पैसे प्रति युनिट इतका झाला आहे. तसेच उच्चदाब कृषी Agriculture Electricity पंपासाठीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. 2023-24 यासाठी वर्षासाठी 5 रुपये 96 पैसे आकारण्यात येणार आहे. तर 2024-25 मध्ये 6 रुपये 38 पैसे एवढा दर आकारण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उन्हासोबत वीज दर वाढीचा चटका लागणार आहे.

कृषी वीजदरातच खूप वाढ

महावितरणने केलेली दरवाढ ही इतर क्षेत्रामध्ये केलेल्या वीज दर वाढीपेक्षा कृषी क्षेत्रामध्ये जास्त आहे. उच्च दाब कृषी पंपाची प्रतियुनिट दरवाढ ही तब्बल 38.21% एवढी आहे. तर लघुदाब कृषी पंपासाठी ही वाढ 38.18% एवढी आहे. या दरवाढीमुळे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. मात्र या दरवाढीतून महावितरणला 39,567 कोटी रुपये एवढा महसूल मिळणार आहे.

का घेतला असा निर्णय

महावितरणच नव्हे तर राज्यामधील इतर वीज कंपन्या म्हणजे बेस्ट, टाटा आणि अदानी यांनी देखील वीज दरामध्ये वाढ केली आहे. कशासाठी? तर महसुली तूट भरून काढण्यासाठी. महावितरणची महसुली तूट 67,643 कोटी रुपये एवढी मोठी आहे. यामध्ये राज्य वीज नियामक आयोगाने 39,537 कोटींची वाढ मंजूर केली आहे. या वीज दरवाढीचा फटका सबंध वीज ग्राहकांना बसणार आहे.

Leave a Comment