अग्निपथ योजनेबाबत मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालय म्हणाले

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आज या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

उच्च न्यायालयाने अग्निपथ याेजनेबाबत दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करु इच्छित नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तिन्ही सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना स्वीकारली आहे. या योजनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या 2 याचिका फेटाळताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा तो निर्णय कायम ठेवला आहे. कोर्ट म्हणाले, “माफ करा, आम्ही हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. हायकोर्टाने सर्व पैलूंचा विचार केला आहे”, असं म्हणत गोपाल कृष्ण आणि अधिवक्ता एमएल शर्मा यांच्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भारतीय वायुसेनेतील अग्निपथ योजनेद्वारे भरतीला आव्हान देणाऱ्या नव्या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकेवर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या नव्या अर्जावर न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवले आहे. त्यांच्या जबाबानंतरच सुनावणी होणार आहे, अशी माहीती आहे.

Leave a Comment